घोलवड ग्रामपंचायत चे उद्दिष्ट व ध्येय
(शिक्षण क्षेत्र )
- ग्रामपंचायत सर्व मुलांना दर्जेदार प्राथमिक व माध्यमिक शिक्षण उपलब्ध करून देणे.
- शाळाबाह्य मुलांच्या शोध घेऊन त्यांना शिक्षण प्रवाहात आणणे.
- डिजिटल शिक्षण ई लर्निंग व वाचनालयाची सुविधा वाढवणे.
- मुलांच्या शिक्षणावर विशेष भर देणे व उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे.
- युवकांसाठी कौशल्य विकास व संगणक प्रशिक्षण केंद्र सुरू करणे .
(रोजगार व उद्योग )
- ग्रामस्थांसाठी स्थानिक रोजगार निर्मिती करणे .
- बचत गटाच्या माध्यमातून लघुउद्योग सुरू करणे.
- पर्यटन हस्तकला शेती उत्पादन प्रक्रिया याद्वारे रोजगार वाढवणे.
- तरुणांना स्वयंरोजगारासाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती व मार्गदर्शन देणे.
(कृषी विकास)
- शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती *आधुनिक शेती पद्धती व जलसंधारण याबाबत प्रशिक्षण देणे .
- सिंचनाची व्यवस्था सुधारणे व पाण्याच्या योग्य वापर सुनिश्चित करणे .
- शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध करून देणे व शेतकरी उत्पादक गट स्थापन करणे.
- फळबागा फुल शेती भाजीपाला शेती यांना प्रोत्साहन देणे .
- मधमाशी पालन प्रोत्साहन देणे व प्रशिक्षण देणे.
(पाणीपुरवठा व स्वच्छता )
- सर्व घरांना शुद्ध व पुरेसा पाणीपुरवठा करणे.
- पावसाच्या पाण्याचे संकलन रेन हार्वेस्टिंग प्रकल्प राबवणे
- ग्रामस्वच्छता मोहिमेद्वारे गाव स्वच्छ व सुंदर ठेवले .
- कचरा व्यवस्थापन व सांडपाणी निचरा यांची प्रभावी व्यवस्था करणे.
(आरोग्य व सामाजिक विकास)
- गावात प्राथमिक आरोग्य केंद्राची सुविधा व औषधे उपलब्धता निश्चित करणे .
- नियमित आरोग्य शिबिरे महिला व बाल आरोग्य तपासणी मोहीम राबवणे.
- स्वच्छ पाणी पोषण आहार व स्वच्छता याबाबत जनजागृती करणे .
- व्यसनमुक्ती व आरोग्यदायी जीवनशैलीसाठी अभियान राबवणे .
(हरित गाव निर्मिती )
- गावातील प्रत्येक कुटुंबाने किमान पाच झाडे लावून व त्यांची निगा राखणे.
- सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण करून हरित पट्टा तयार करणे .
(जल संवर्धन व साठवणूक )
- पावसाच्या पाण्याचे संकलन रेन हार्वेस्टिंग प्रकल्प राबवणे.
- तलाव विहिरी बंधारे ओहळाची साफसफाई व दुरुस्ती करणे.
- पाणी वाया न घालवता त्याच्या उपयोग वापर करण्याबाबत जनजागृती करणे.
(कचरा व्यवस्थापन )
- घरगुती व सार्वजनिक कचऱ्याचे वर्गीकरण ओला सुखा कचरा वेगळा करणे सक्तीचे अमलात आणणे .
- जैविक कचऱ्यापासून सेंद्रिय खत निर्मिती करणे .
- प्लास्टिकचा वापर कमी करून पर्यावरण पूरक वस्तूच्या वापर प्रोत्साहन देणे.
(हवा व ध्वनी प्रदूषण नियंत्रण )
- दूरध्वनी व प्लॅस्टिक प्रदूषणावर नियंत्रणासाठी स्थानिक नियम तयार करणे .
- स्वच्छ इंधनाचा वापर वाढवणे व वाहतूक साधनाचे प्रदूषण प्रमाण तपासणे.
(स्वच्छ व सुंदर ग्राम परिसर)
- शाळा रस्ते नद्या तलाव परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी ग्राम स्तरीय समिती तयार करणे.
- स्वच्छ गाव सुंदर गाव ही संकल्पना प्रत्यक्षात आणणे .
- पर्यावरण जनजागृती झाडावर ग्राम पातळीवर. पर्यावरण दिन वृक्षारोपण दिन साजरे करणे .
- ग्रामसभा मधून पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करणे .