घोलवड ग्रामपंचायतमध्ये हस्तकला, पर्यटन व मधमाशीपालन विकासासाठी उपक्रमांना चालना
महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ व भारतीय हस्तकौशल्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने घोलवड गावातील बांबूपासून विविध शोभिवंत हस्तकौशल्य कारागीर यांना प्रशिक्षण देवून त्यांना आज १५० वस्तु बनवितात या वस्तू घेण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात येत आहेत तसेच या महिलावर्ग ना खूप घर बसल्या रोजगार निर्माण झाल्या आहे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाकडून ( काॅनटेक बॅस) यांच्या खूप सुंदर मार्गदर्शन हे शक्य झाले आहे. तसेच भारतीय हस्तकौशल्य विभाग यांनी वारली पेंटिंग प्रशिक्षण कलाकार निर्माण होतील व या प्रशिक्षणात सर्व सहभाग घेऊन टेनिंग पुर्ण केलेल्या कारागीराना आर्टीझन कार्ड देण्यात आले.त्यामुळे बॅकेत त्याना कर्ज घेण्यासाठी सोईस्कर झाले आहेत. यामुळे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास मंडळाला घोलवड ग्रामपंचायत पर्यटनाचा’ ब’ दर्जा मिळावा .
घोलवड ग्रामपंचायत हि महाराष्ट्र राज्य ने घोलवड ग्रामपंचायत महाराष्ट्रातील तीसरे गाव घोषित करून या गावातील पुर्वी पासुन शेतकरी आपल्या चिकू बागायतदार भाजीपाला लागवडीखालील क्षेत्रात मधमाशीपालन व्यवसाय करून आज अनेक शेतकरीवर्ग मधापासून उत्पादन घेऊन आज पयार्वरण संतुलन होण्यास खूप मदत होत आहे. यामध्ये शासनाकडून पेट्या साठी ९०% अनुदान देण्यात येत असून घोलवड गावातील शेतकरीवर्ग या योजनेचा फायदा नक्कीच होईल या घोलवड गावात या योजनेंतर्गत प्रशिक्षणहाॅल, मधसंकलन केंद्र, मधुबंध, प्रयोगशाळा, या गोष्टी होणार आहेत.








































































